शहराला म्हेत्रे वस्ती येथील वॉटर फिल्टर प्रकल्पातून पाणी द्यावे, नगरसेवक यश साने यांची मागणी
Mar 10 2026
33
शहराला म्हेत्रे वस्ती येथील वॉटर फिल्टर प्रकल्पातून पाणी द्यावे, नगरसेवक यश साने यांची मागणी
पिंपरी, ता. १० - पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शहराला म्हेत्रे वस्ती येथील वॉटर फिल्टर प्रकल्पातून संपूर्ण पाणी मिळावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक यश दत्ताकाका साने यांनी महापौर रवी लांडगे यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात यश साने यांनी महापौरांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, कृष्णानगर म्हेत्रे वस्ती येथील पाणी फिल्टर प्रकल्पातून सध्या सुमारे ३० एमएलडी पाणी पुणे (वाघोली) येथे पाठवले जात आहे. मात्र पिंपरी-चिंचवड शहरात वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती गरज लक्षात घेता शहरातील नागरिकांना पाण्याअभावी त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर म्हेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून होणारा पाणीपुरवठा पिंपरी-चिंचवड शहरासाठी उपलब्ध करुन द्यावा. शहरातील पाणी टंचाईची समस्या कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.