पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पास विरोध, १ जुलै रोजी धरणे आंदोलन

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पास विरोध, १ जुलै रोजी धरणे आंदोलन

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पा विरोधात १ जुलै रोजी धरणे आंदोलन 

पिंपरी, ता. २९ - पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत येत्या 3 जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडमधील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली आहे. मात्र, आज मावळातील नागरिकांनी बैठक घेऊन या प्रकल्पाला विरोध केला आहे.

येत्या १ जुलै रोजी वडगाव येथील मावळ तहसीलदार कार्यालय समोर पवना बंदिस्त जलवाहिनी कृती समितीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात त्यांनी आज मावळच्या नायब तहसीलदारांना निवेदन देऊन मावळ मधील पवना धरण प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचा प्रलंबित पुनर्वसन प्रश्न, पर्यायी जमीन मोबदला हे दोन मुख्य प्रश्न पहिले सोडवण्याची मागणी केली आहे.

या संदर्भात सोमाटणे फाटा येथील इंद्रायणी हॉटेल येथे आज भाजपा किसान मोर्चा मावळ तालुक्याचे पदाधिकारी व जमीन हक्क परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक होऊन पवना बंदिस्त जलवाहिनीला ठाम विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधी कृती समिती स्थापन करण्यात आली. त्यामध्ये ज्ञानेश्वर दळवी, विश्वनाथ शेलार, भारत ठाकूर, यशवंतराव बोडके, सुभाष धामणकर ,एकनाथ टिळे, नारायण बोडके, सूर्यकांत सोरटे, माऊली सोनवणे यांचा समावेश आहे. या  उपस्थित पदाधिकाऱ्यांनी या प्रकल्पाला ठाम विरोध केला आहे. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories