पुणे-साईनगर शिर्डी एक्स्प्रेसची सुरवात, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुण्यातून झेंडा दाखवून प्रारंभ
पुणे-साईनगर शिर्डी एक्स्प्रेसची सुरवात, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुण्यातून झेंडा दाखवून प्रारंभ
पुणे, ता. १४ - पुणे-साईनगर शिर्डी एक्स्प्रेसला बुधवारी (ता. १७) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतून ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहत तर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुण्यातून झेंडा दाखवून प्रारंभ केला.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे उपस्थित होते. पुणे रेल्वे स्थानक येथे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, आमदार विवेक कोल्हे आदी उपस्थित होते.
गाडी क्रमांक ११४२३ पुणे-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस पुणे स्थानकावरून दररोज सकाळी ६.५५ वाजता सुटून दौंड, श्रीगोंदा, अहिल्यानगर, राहुरी आणि बेलापूरमार्गे दुपारी १२ वाजता शिर्डी येथे पोहोचेल. परतीची ११४२४ साईनगर शिर्डी-पुणे एक्स्प्रेस शिर्डीहून सायंकाळी ६.१० वाजता सुटून बेलापूर, राहुरी, अहिल्यानगर, श्रीगोंदा रस्ता आणि दौंड स्थानकांवर थांबे घेत रात्री ११.५५ वाजता पुण्यात येईल, अशी माहिती रेल्वे बोर्डाचे निदेशक संजय नीलम यांनी दिली.
- केंद्रीय राज्यमंत्री, Pune Railway Station, पुणे रेल्वे स्थानक, Pune, Shirdi, Sainagar Shirdi Station,
- , Chandrakant Patil, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, Murlidhar Mohol,
- उद्घाटन, Ashwini Vaishnaw, रेल्वे मंत्री, Devendra Fadnavis, मुख्यमंत्री,
- पुणे-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस, Pune Sainagar Shirdi Express, inauguration,