संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात
पिंपरी, ता. ३ - देहूगावामध्ये संत तुकाराम महाराज बीज सोहळा गुरुवारी (ता. ५) साजरा होत आहे. लाखो भाविक देहूमध्ये येणार असल्याने त्यांच्या सुरक्षिततेसाठी देहूरोड पोलिस प्रशासनाने व्यापक तयारी केली आहे. संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त देऊळवाडा ते वैकुंठस्थान परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. बंदोबस्तासाठी २२० पोलिस कर्मचारी कार्यरत राहणार असल्याची माहिती देहूरोड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिली आहे.
बीज सोहळ्याच्या दोन दिवस आधीपासूनच देहूत पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिस यंत्रणा तत्पर असेल.
असा आहे पोलिस बंदोबस्त -
- सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) ४
- पोलिस निरीक्षक १२
- सहायक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक ४४
- पोलिस कर्मचारी २२०
- होमगार्ड ८०
- राज्य राखीव पोलिस दल तुकड्या २
-बॉम्बशोधक व नाशक पथक १
- श्वानपथक१
- जीवरक्षक पथक १
- एनडीआरएफ टीम १