news
clock
'मिसिंग लिंक' मार्गावर फोटोसेशन करु नका, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची प्रवाशांना सूचना

'मिसिंग लिंक' मार्गावर फोटोसेशन करु नका, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची प्रवाशांना सूचना

 'मिसिंग लिंक' मार्गावर फोटोसेशन करु नका, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची प्रवाशांना सूचना 

पुणे, ता. ४ - ड्रीम प्रोजक्ट असलेल्या 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे महाराष्ट्र दिनी लोकार्पण झाले. त्यानंतर, या मार्गावरुन जाताना अनेक लोक फोटोसेशन करु लागले आहेत. ही बाब समोर आली आहे.   महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) हाय-स्पीड कॉरिडॉर हे पर्यटन स्थळ नाही त्यामुळे  प्रवाशांनी या मार्गावर फोटो काढण्यासाठी थांबू नये अशी कडक सूचना दिली आहे. 

मिसिंग लिंक मार्गावरील केबल स्टेड ब्रिज आणि बोगद्याजवळ रेंगाळणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून बारीक नजर ठेवली जात आहे. हा द्रुतगती मार्ग असून येथे वाहने थांबवण्यास सक्त मनाई आहे. वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे भीषण अपघाताचा धोका संभवतो. त्यामुळे, फोटोसेशनसाठी स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नये. प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी हा मार्ग साकारला आहे. सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी नियमांचे पालन करा.  नियम मोडणाऱ्यांना मोठा दंड आकारला जाणार आहे, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सष्ट केले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories