ॲपद्वारे नावनोंदणी केल्यावरच महापालिकेच्या इमारतीत प्रवेश मिळणार, अॅप विकसित करण्याचे काम सुरु
Apr 20 2026
19
ॲपद्वारे नावनोंदणी केल्यावरच महापालिकेच्या इमारतीत प्रवेश मिळणार, अॅप विकसित करण्याचे काम सुरु
पिंपरी, ता. २० - नुकतेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्यालयात स्वच्छतागृहात मद्याची बाटली आढळली. त्यामुळे, सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यासाठी उपायोजना करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. त्यानुसार, महापालिका भवनामध्ये प्रवेशासाठी विशेष अॅप्लिकेशन विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहेत. या ॲपद्वारे नावनोंदणी केल्यावरच नागरिकांना महापालिकेच्या इमारतीत प्रवेश मिळणार आहे. अधिकारी, कर्मचारी व कंत्राटी कामगारांना ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही.
महापालिका भवनात दररोजच विविध कामांसाठी येणाऱ्या नागरीकांची गर्दी असते. सध्या प्रवेशद्वारावर कागदी पास देऊन प्रवेश दिला जातो. सुरक्षेच्या दृष्टीने ही पद्धत अपुरी ठरत असल्याने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अधिक कडक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. मद्याची बाटली सापडल्यानंतर प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.
नवीन ॲप सुरु झाल्यानंतर नागरिकांना संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी घरबसल्या वेळ (अपॉइंटमेंट) घेता येईल. भेटीची वेळ घेताना नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक द्यावा लागणार आहे. त्यानंतर मोबाईलवर ओटीपीद्वारे क्यूआर कोड मिळेल. हा क्यूआर कोड महापालिकेच्या प्रवेशद्वारावर दाखवून प्रिंट काढता येईल. ही प्रिंट दाखवल्यानंतरच प्रवेश दिला जाईल. ज्या दिवशी वेळ घेतली आहे, त्याच दिवशी प्रवेश मिळणार आहे. कार्यालयीन वेळेनंतर प्रवेश दिला जाणार नाही, असे हे अॅप्लिकेशन असणार आहे.
- ओटीपी, OTP, कर्मचारी, employees, कंत्राटी कामगार, contract workers, ओळखपत्र, identity card,
- नावनोंदणी, registration, प्रवेश, entry, अधिकाऱ्यांची भेट, meeting with officials, अपॉइंटमेंट, appointment, क्यूआर कोड, QR code,
- मुख्यालय, headquarters, स्वच्छतागृह, restroom, मद्याची बाटली, liquor bottle, सुरक्षा व्यवस्था, security arrangements, अॅप्लिकेशन, application
- "पिंपरी-चिंचवड महापालिका, Pimpri-Chinchwad Municipal Corporation