news
clock
बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरुन युवकाला जबर मारहाण

बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरुन युवकाला जबर मारहाण

बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरुन युवकाला जबर मारहाण 

पिंपरी, ता. १२ - ओळखीच्या युवकाच्या बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरुन झालेल्या वादात २२ वर्षीय युवकाला त्याच्या ओळखीच्या चार जणांनी लाथा बुक्यांनी, दांडक्याने व तेथे पडलेल्या दगडाने मारहाण करुन जखमी केले.  ही घटना  रविवारी (ता. १०) रात्री साडेअकराच्या सुमारास रामनगर-चक्रपाणी वसाहत-भोसरी येथे घडली आहे. आरोपी युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारहाण झालेला युवक शुभम भगवान दुतोंडे (वय २२ वर्षे, रा. भोसरी) यांने तक्रार दिली आहे. चक्रपाणी वासहत परिसरात राहणाऱ्या  बंटी गायकवाड, सुमित शिंदे, पप्पु गायकवाड, आदित्य सावद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी शुभम हा घरासमोर बसलेला असताना आरोपींनी त्याला एका आरोपीच्या  बहिणीशी प्रेम संबंध असल्याचा संशय घेऊन शिवीगाळ केली आणि दमदाटी करुन हाताने, लाथाबुक्यांनी, दांडक्याने व तेथे पडलेल्या दगडाने मारहाण केली. यात शुभम जखमी झाला आहे. 

आरोपींवर  भोसरी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१) ३५२, ३५१ (२), ३ (५) व भारतीय दंड विधान कलम ३२४,५०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories