गावठी हातभट्टीच्या दारुची वाहतूक करणारा २३ वर्षीय युवक अटकेत

गावठी हातभट्टीच्या दारुची वाहतूक करणारा २३ वर्षीय युवक अटकेत

गावठी हातभट्टीच्या दारुची वाहतूक करणारा २३ वर्षीय युवक अटकेत

पिंपरी, ता. ३० -  बेकायदेशीररीत्या गावठी हातभट्टीच्या दारुची वाहतूक करणाऱ्या २३ वर्षीय युवकाला पोलिसांनी मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथून सोमवारी (ता. २९) ताब्यात घेतले. त्याच्याकडून ७ हजार रुपयांची ७० लिटर दारु पोलिसांनी जप्त केली आहे. 

याबाबत, पिपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दारुबंदी पथकाचे पोलिस शिपाई लक्ष्मीकांत पतंगे यांनी तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. २९) सुदंबरे-तळेगाव दाभाडे रस्त्यालगत ही कारवाई करण्यात आली. आरोपी राज दुलकसिंग राजपूत (वय २३, रा. हनुमानवाडी, वाकी बुद्रुक, ता. खेड) हा मारुती वॅगनर कारमधून ७ हजार रुपयांची, सुमारे ७० लिटर गावठी हातभट्टीची दारु नेत होता. ही दारु त्याने प्रदीप गुड्दावन (रा. गाडामोडी, ता. यवत, जि. पुणे) याच्याकडून आणली होती. 

आरोपीविरुद्ध तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories