तळेगाव दाभाडे येथे अज्ञात दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

तळेगाव दाभाडे येथे अज्ञात दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

तळेगाव दाभाडे येथे अज्ञात दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

पिंपरी, ता. ३० - तळेगाव दाभाडे येथील धन्वंतरी हॉस्पिटलसमोर अज्ञात दुचाकीच्या धडकेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. २८) रात्री घडली. अपघातानंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरून फरार झाला असून, त्याच्याविरुद्ध तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात रविवारी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास तळेगावहून चाकणकडे जाणाऱ्या रस्त्यावर धन्वंतरी हॉस्पिटलसमोर घडला. फिर्यादी नरेंद्र रघुनाथ जोशी (वय ५८, रा. कृष्णा गार्डन, नडेनगर, काळेवाडी, पिंपरी) यांचे भाऊ रस्ता ओलांडत असताना अज्ञात दुचाकीस्वाराने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांना गंभीर तसेच किरकोळ दुखापती झाल्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

अपघातानंतर संबंधित दुचाकीस्वाराने जखमीला कोणतीही मदत न करता तसेच अपघाताची माहिती न देता घटनास्थळावरून पलायन केले. या प्रकरणी अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १०६(१), १२५(क), १२५(अ) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८७ अन्वये रविवारी (दि. २९) सकाळी ९.३२ वाजता तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories