'सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन पुरस्कार' विजेत्या अबोली जरित महापौरांच्या हस्ते सन्मान
पिंपरी, ता. १५ - दिव्यांगजन सशक्तीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल भारत सरकारच्या 'सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन पुरस्कार २०२५' ने सन्मानित झालेल्या अबोली जरित यांचा नुकताच महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नागपूर येथील अबोली जरित यांनी शारीरिक अडचणींवर मात करत गायन, मॉडेलिंग आणि सामाजिक जनजागृतीच्या माध्यमातून देशभरातील दिव्यांग बांधवांसाठी प्रेरणेचा दीप प्रज्वलित केला आहे. त्यांच्या जिद्द, आत्मविश्वास आणि संघर्षमय प्रवासाने अनेकांना नवी दिशा दिली आहे.
सत्कारानंतर अबोली यांनी गायन सादर केले. तसेच महापौर व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारल्या. यावेळी सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसदस्य प्रविण भालेकर, यश साने उपस्थित होते.