news
clock
ग्रिकोरोमन कुस्ती स्पर्धेत शहरातील पैलवान अजिंक्य माचुत्रे याची कांस्यपदकाची कामगिरी

ग्रिकोरोमन कुस्ती स्पर्धेत शहरातील पैलवान अजिंक्य माचुत्रे याची कांस्यपदकाची कामगिरी

ग्रिकोरोमन कुस्ती स्पर्धेत शहरातील पैलवान अजिंक्य माचुत्रे याची कांस्यपदकाची कामगिरी

पिंपरी, ता. ३ - वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे नुकत्याच झालेल्या दुसऱ्या ग्रिकोरोमन वरिष्ठ गट महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पिंपरी-चिंचवडच्या अजिंक्य माचुत्रे याने कांस्यपदक पटकावले. अजिंक्यच्या या यशाबद्दल पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, कार्याध्यक्ष विशाल कलाटे, भारत केसरी विजय गावडे, सरचिटणीस संतोष माचुत्रे,  इतर पदाधिकारी व कुस्तीप्रेमींनी त्याचे अभिनंदन केले.

स्पर्धेतील पहिल्या फेरीत अजिंक्यने धाराशिवच्या प्रतिस्पर्ध्यावर ८-० असा एकतर्फी विजय मिळवला. दुसऱ्या फेरीत पुणे शहरच्या मल्लाविरुद्ध चितपट करत विजय मिळवून पुढील फेरीत प्रवेश केला. तिसऱ्या फेरीत पुणे जिल्ह्याच्या खेळाडूविरुद्ध ४-५ गुणांनी पराभव झाला. मात्र, रिपेचेच फेरीत अजिंक्यने पुनरागमन करत कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत जळगाव जिल्ह्याच्या मल्लावर ८-० असा दणदणीत विजय मिळवत तृतीय क्रमांक पटकावला.

अजिंक्य सध्या रहाटणी येथील काळभैरवनाथ तालीममध्ये पैलवान किशोर नखाते आणि अजय लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. अजिंक्यच्या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories