अजितदादांच्या स्मृती जपताना त्यांचे एकच अधिकृत छायाचित्र वापरावे, पार्थ पवार यांचे आवाहन
Mar 21 2026
79
अजितदादांच्या स्मृती जपताना त्यांचे एकच अधिकृत छायाचित्र वापरावे, पार्थ पवार यांचे आवाहन
पुणे, ता. २१ - उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृती जपताना त्यांच्याविषयीचा आदर सुसंगतपणे व एकसंधपणे व्यक्त व्हावा म्हणून बॅनर्स, जाहिराती, घर किंवा कार्यालयात लावण्यासाठी अजितदादांचे एकच अधिकृत छायाचित्र वापरले जावे, असे आवाहन खासदार पार्थ पवार यांनी केले आहे. पार्थ यांनी अजितदादांचे एक छायाचित्रही यासाठी पोस्ट केले आहे.
याबाबत पार्थ यांनी समाजमाध्यमांवर आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, अजितदादांच्या स्मृतींना अभिवादन करताना त्यांच्या कार्याची आठवण ठेवून एकसंधतेने आदर व्यक्त केला पाहिजे. आयुष्यभर शिस्त, समर्पण आणि विकासाचा ध्यास घेत त्यांनी महाराष्ट्राची सेवा केली. त्यांच्या कार्यातून निष्ठा, कर्तव्यभावना आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी समाजाला प्रेरणा देणारी ठरली आहे. हीच एकसंधता, शिस्त आणि भावना दादांना खरी आदरांजली ठरेल.
अजितदादांच्या त्यांच्या विचारांना कृतीत उतरवत त्यांच्या कार्याचा वारसा जपूया आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एकदिलाने पुढे जाऊया, असे पार्थ यांनी म्हटले आहे.