आळंदी देवस्थानच्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण, भाविकांना नम्र सेवा देण्याची घेतली माऊलींची शपथ

आळंदी देवस्थानच्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण, भाविकांना नम्र सेवा देण्याची घेतली माऊलींची शपथ

आळंदी देवस्थानच्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण, भाविकांना नम्र सेवा देण्याची घेतली माऊलींची शपथ

पिंपरी, ता. २९ - संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरातील कर्मचाऱ्यांमध्ये स्वयंशिस्त, जबाबदारी आणि सेवाभाव वाढवण्यासाठी आळंदी देवस्थानच्या वतीने एका विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. म

मागील महिन्यातील दानपेटी चोरीच्या पार्श्वभूमीवर या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. पुण्याचे सह धर्मादाय आयुक्त दिनेश कोथळीकर यांच्या हस्ते आणि देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे व इतर विश्वस्तांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. 

व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. अभय कुलकर्णी, डॉ. श्रीकांत कल्लूरकर आणि डॉ. सुधीर हसमनीस यांनी ज्ञानेश्वरीतील ओव्या आणि व्यावहारिक उदाहरणांच्या माध्यमातून सोप्या मराठीत हे प्रशिक्षण दिले. प्रत्येक भाविकामध्ये माऊलींचे रूप पाहून नम्रतेने सेवा करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.  प्रशिक्षणाच्या शेवटी सर्व कर्मचाऱ्यांनी भाविकांशी आदराने वागण्याची आणि देवस्थानाची प्रतिष्ठा जपण्याची शपथ घेतली.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories