जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज आणि  श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी पोलिस आयुक्तालयात आढावा बैठक

जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी पोलिस आयुक्तालयात आढावा बैठक

जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज आणि  श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी पोलिस आयुक्तालयात आढावा बैठक 

पिंपरी, ता. २४ - आषाढी वारीसाठी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या ३४१ व्या पालखी प्रस्थान सोहळ्याचे प्रस्थान दिनांक ७ जुलै आणि श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या १९५ व्या पालखी प्रस्थान सोहळ्याचे प्रस्थान दिनांक ८ जुलैला होणार आहे. पालखी सोहळा शांततेने व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी पालखी सोहळ्याचे संयोजक व पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या बैठका पोलिस आयु्क्त कार्यालयात नुकत्याच पार पडल्या.  

दिनांक १८ जूनला झालेल्या जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या बैठकीमध्ये जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज मंदिर संस्थानाचे अध्यक्ष श्री जालिंदर विश्वनाथ मोरे महाराज, पालखी सोहळा प्रमुख विक्रमसिंह उमराज मोरे, लक्ष्मण दत्तात्रय मोरे, उमेश सुरेश मोरे, विश्वस्त दिलीप नारायण मोरे, गणेश उत्तम मोरे, वैभव आशोक मोरे हे उपस्थित होते. दिनांक २३ जूनला श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या बैठकीमध्ये मंदिर संस्थानाचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे, विश्वस्त व पालखी सोहळयाचे प्रमुख राजेंद्र बाबूराव उमाप, विश्वस्त योगी निरंजनाथ गुरु शांती नाथ, विश्वस्त चैतन्य केशवराव लोंढे (कबीरबुवा), विश्वस्त अॅड. रोहीणी पवार, विश्वस्त पुरुषोत्तम मुरलीधर पाटील, ज्ञानेश्वर वीर, दिंडी मालक राजेंद्र बाळासाहेब पवार (अफळाकर) हे उपस्थित होते.

बैठकीत प्रस्थान सोहळा, मंदिर परिसर व पालखी मार्गावर येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय योजनांबाबत चर्चा झाली. बैठकीमध्ये वाहतूक व्यवस्था व नियोजन, पर्यायी मार्ग, दिंडीची वाहने व वारक-यांना मार्गदर्शन होईल या दृष्टीने समन्वय ठेवणे या बाबत सर्व पोलिस अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. गर्दीचे व्यवस्थापन व कायदा व सुव्यवस्था दृष्टीने कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच आषाढी वारी व पालखी सोहळयात सहभागी होणा-या सर्व वारक-यांना सुरक्षितता व शांततेच्या मार्गाने संपूर्ण सोहळा भक्तीमय वातावरणात सर्वांचे सहकार्य व समन्वयाने पार पाडला जाईल याबाबत पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पालखी सोहळा विश्वस्तांचा सन्मान करण्यात आला.

सदर, दोन्ही बैठकांसाठी  डॉ. शशिकांत महावरकर (पोलिस सह आयुक्त), सारंग आवाड (अपर पोलिस आयुक्त, गुन्हे), बसवराज तेली (अपर पोलिस आयुक्त, प्रादेशिक विभाग), श्वेता खेडकर (पोलिस उप आयुक्त परिमंडळ - ४), संदिप आटोळे (पोलिस उप आयुक्त, परिमंडळ - १), रोहीदास पवार (पोलिस उप आयुक्त, गुन्हे शाखा),  मारुती जगताप (पोलिस उप आयुक्त, परिमंडळ - ३), धीरज पाटील (पोलिस उप आयुक्त, विशेष शाखा), विक्रांत देशमुख (पोलिस उप आयुक्त, वाहतुक शाखा) उपस्थित होते. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories