राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे दोन दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे दोन दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन
फोक संस्कृती, लोक संस्कृतीतून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन, गौरवशाली महाराष्ट्र आणि अभिवादन कार्यक्रमांचा समावेश
पिंपरी, ता. २३ - सामाजिक न्याय, शिक्षण, समता आणि बहुजन कल्याणाचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे व्यापक विचार समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. २५ व २६ जून २०२६ या कालावधीत चिंचवड येथील साई मंदिर उद्यान, संभाजीनगर तसेच महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारत आणि के.एस.बी. चौक येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रबोधन पर्वाचे उद्घाटन गुरूवार, दि. २५ जून रोजी सायंकाळी ७.०० वाजता संभाजीनगर, चिंचवड साई मंदिर उद्यान येथे महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणारा ‘फोक संस्कृती’ हा ५० हून अधिक कलाकारांचा बहुरंगी कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.
दिनांक २६ जून रोजी सकाळी १०.३० वाजता पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी १०.४५ वाजता के.एस.बी. चौक, निगडी भोसरी रोड येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे.
सायंकाळी ५.०० वाजता साई मंदिर उद्यान येथे ‘स्वर स्वामी प्रस्तुत – नमन… शाहूं महाराजांच्या कार्याला’ हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यानंतर सायंकाळी ७.०० वाजता ‘गौरवशाली महाराष्ट्र’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम रसिकांना अनुभवता येणार आहे.
या कार्यक्रमास केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच उपमुख्यमंत्री, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, राज्यसभा सदस्य मेधा कुलकर्णी, पार्थ पवार, विधान परिषद सदस्य उमा खापरे, अमित गोरखे तसेच आमदार महेश लांडगे, शंकर जगताप आणि शंकर मांडेकर, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, गटनेते विश्वजित बारणे, सभापती सुजाता बोराटे, संजय काटे, राणी पठारे, रविना अंगोळकर, कैलास कुटे, नगरसदस्य अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, कुशाग्र कदम व तुषार हिंगे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय विविध लोकप्रतिनिधी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी शिक्षण, सामाजिक समता, आरक्षण, महिला सक्षमीकरण आणि वंचित घटकांच्या उत्थानासाठी दिलेले योगदान आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा तसेच नव्या पिढीला त्यांच्या कार्याची ओळख व्हावी, या उद्देशाने या विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे.
महापालिकेच्या वतीने आयोजित राजर्षी छत्रपती शाहू महाराज विचार प्रबोधनपर्व कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रबोधन पर्वात सहभागी व्हावे असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे वेळापत्रक -
दि. २५ जून २०२६ (गुरुवार)
🕖 सायंकाळी ७.०० वा. उद्घाटन व त्यानंतर..
फोक संस्कृती – बहुरंगी सांस्कृतिक कार्यक्रम
📍 स्थळ : साई मंदिर उद्यान, संभाजीनगर, चिंचवड
दि. २६ जून २०२६ (शुक्रवार)
🕥 सकाळी १०.३० वा.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण
📍 स्थळ : मुख्य प्रशासकीय इमारत, पिंपरी
🕥 सकाळी १०.४५ वा.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण
📍 स्थळ : के.एस.बी. चौक,शाहूनगर,चिंचवड
🕔 सायंकाळी ५.०० वा.
नमन… शाहू महाराजांच्या कार्याला
📍 स्थळ : साई मंदिर उद्यान, संभाजीनगर, चिंचवड
🕖 सायंकाळी ७.०० वा.
गौरवशाली महाराष्ट्र- लोककलेचा कार्यक्रम
📍 स्थळ : साई मंदिर उद्यान, संभाजीनगर, चिंचवड.