भोंदू अशोक खरातच्या पोलिस कोठडीत वाढ
पुणे, ता. २४ - भोंदू अशोक खरात याची पोलीस कोठडीची मुदत आज, मंगळवारी (ता. २४) संपली. . खरातला दुपारी नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने खरातच्या पोलिस कोठडीत २९ मार्चपर्यंत वाढ (पीसीआर) केली आहे.
विशेष तपास पथकाच्या तपासणीत भोंदू खरातची अनेक काळी कृत्ये समोर येत आहेत. त्यामुळे या प्रकरणात आणखी गंभीर घटना घडल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे. खरातकडून जप्त करण्यात आलेल्या पिस्तूलने त्याने पाच नरबळी दिल्याचा संशय आहे. त्यामुळे असल्याने भोंदू खरातच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी विशेष तपास पथकाने केली होती. मंगळवारी नाशिक सत्र न्यायालयाने खरातला २९ मार्चपर्यंत पीसीआर दिला आहे.