news
clock
भोंदू अशोक खरातच्या शिवनिका संस्थानच्या ट्रस्टींची व निकटवर्तीयांचीही चौकशी होणार

भोंदू अशोक खरातच्या शिवनिका संस्थानच्या ट्रस्टींची व निकटवर्तीयांचीही चौकशी होणार

भोंदू अशोक खरातच्या शिवनिका संस्थानच्या ट्रस्टींची व निकटवर्तीयांचीही चौकशी होणार

पुणे, ता. २३ - भोंदू अशोक खरातची काल रविवारी (ता. २२) 'एसआयटी'ने बारकाईने दीर्घकाळ चौकशी केली. त्यातून त्याची काळी कृत्ये समोर येत आहेत. खरातच्या शिवनिका संस्थानच्या ट्रस्टींची तसेच निकटवर्तीयांचीही चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अशोक खरातने स्थापन केलेल्या शिवनिका संस्थानच्या ट्रस्टींचीही चौकशी होणार असून खरातने कोट्यवधींची संपत्ती कशी कमावली, या शोध देखील पोलिसांकडून घेतला जाणार आहे. शिवनिका संस्थांनचे अध्यक्षपद  खरातकडे होते. खरातने पत्नी आणि निकटवर्तीयांना विश्वस्तपद दिले होते.  रुपाली चाकणकरही या संस्थानवर ट्रस्टी होत्या. त्यामुळे या प्रकरणात चाकणकरांचीही चौकशी होण्याची शक्यता  आहे.

 मिरगावच्या ईशान्येश्वर महादेव मंदिराचा पुजारी प्रमोद गडाख, एका सुरक्षारक्षक व फार्महाउसच्या वॉचमनची रविवारी (दि. २२) 'एसआयटी'ने चौकशी केली. मंदिर आणि बंगल्यातील हालचालींबाबत सविस्तर माहिती घेतली. नाशिकच्या गोविंदनगरातील बंगला आणि कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयातून सीसीटीव्हीचा डीव्हीआर जप्त केला आहे. ईशान्येश्वर मंदिर आणि खरातचे फार्महाउस एकाच परिसरात आहे. या ठिकाणी सुमारे अर्धा किलोमीटर परिसरात अन्य कोणतीही वस्ती नाही. उत्सवाचे काही दिवस वगळता मंदिर परिसरात शांतता असते. त्यामुळे या काळात मंदिरात कोण आले आणि कोण गेले, खरात मुक्कामी असताना कोणाची ये-जा असायची, याची माहिती मिळविणे तपासासाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories