मुंढव्यातील पासपोर्ट सेवा केंद्र ३० मार्चपासून कायमस्वरुपी पाषाणला स्थलांतरीत
Mar 23 2026
13
मुंढव्यातील पासपोर्ट सेवा केंद्र ३० मार्चपासून कायमस्वरुपी पाषाणला स्थलांतरीत
पुणे, ता. २३ - पिंपळेवस्ती-मुंढवा येथील पासपोर्ट सेवा केंद्र आता कायमस्वरुपी स्थलांतरीत होणार आहे. ३० मार्च २०२६ पासून या केंद्राचे कामकाज बाणेर-पाषाण लिंक रस्त्यावरील नवीन वास्तूमधून सुरु होणार आहे. प्रशासनाने ही माहिती दिली आहे. त्यामुळे पुणे आणि परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
नवीन केंद्राचा पत्ता 'मॉटक्लेयर बिल्डिंग', पहिला मजला, बाणेर-पाषाण लिंक रस्ता, पाषाण हा आहे. येथे एकाच ठिकाणी सर्व सेवा उपलब्ध असतील. वाढती गर्दी आणि अत्याधुनिक सुविधांची गरज लक्षात घेऊन केंद्र नवीन ठिकाणी स्थलांतरीत केले आहे. बाणेर, पाषाण, औंध, बावधन आणि हिंजवडी आयटी पार्क परिसरातील नागरिकांसाठी हे नवीन केंद्र सोयीचे ठरणार आहे.
दरम्यान, ज्या नागरिकांनी ३० मार्च २०२६ किंवा त्यानंतरच्या तारखेसाठी मुंढवा केंद्राची अपॉइंटमेंट घेतली आहे, त्यांनी आता थेट पाषाण येथील नवीन कार्यालयात उपस्थित राहावे. नागरिकांनी त्यांच्या अपॉइंटमेंटच्या तारीख आणि वेळेत कोणताही बदल करु नये, फक्त पत्ता माहिती करुन घेऊन नवीन ठिकाणी हजर राहावे, असे प्रशासनाने सांगितले आहे.