बिअरची बाटली डोक्यात मारल्याने तरुण जखमी, उत्तर महाळुंगे एमआयडीसीत गुन्हा दाखल

बिअरची बाटली डोक्यात मारल्याने तरुण जखमी, उत्तर महाळुंगे एमआयडीसीत गुन्हा दाखल

 बिअरची बाटली डोक्यात मारल्याने तरुण जखमी, उत्तर महाळुंगे एमआयडीसीत गुन्हा दाखल

पुणे, ता. २० – खेड तालुक्यातील वासुली गाव हद्दीत असलेल्या सुंदबन हॉटेल परिसरात लेबर संदर्भातील वादातून एका तरुणावर बिअर बाटलीने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना दि. १९ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजता घडली. फिर्यादी अक्षय दिनकर भोगाडे (वय ३०, रा. खरपडी बद्रक, ता. खेड, जि. पुणे) यांच्यासोबत आरोपी संदीप वाबळे आणि विजय कांबळे (पूर्ण पत्ता अज्ञात) यांनी वाद घातला.

लेबर कामाच्या कारणावरून झालेल्या वादातून आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यावर बिअरची बाटली मारली. या हल्ल्यात फिर्यादीच्या डोक्याला तसेच कानाला दुखापत झाली.

या घटनेनंतर फिर्यादीने उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी अद्याप अटक नाहीत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चाफळे करीत आहेत.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories