दापोडीत तीन पत्ती जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई; चार जण अटक, २६ हजारांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी, ता. 20 - दापोडी परिसरातील जयभीमनगर येथील एस.आर.ए. स्कीम अंतर्गत नव्याने बांधण्यात येत असलेल्या इमारतीसमोरील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून चार जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत तीन पत्ती जुगारासाठी वापरण्यात येणारा सुमारे २६,७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई दि. १९ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता करण्यात आली. या प्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश श्रावण सोनवणे (वय ३५, पोलीस शिपाई, बॅ. नं. ३१७१, दापोडी पोलीस ठाणे) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कृष्णा रामदुलार यादव (वय ३०, रा. कणसे चाळ, एस.टी. रोड, दापोडी), राकेश विजय जाधव (वय ३३, रा. जयभीमनगर, दापोडी), दिपक लक्ष्मण साळुंखे (वय ३१, रा. सी.एम.ई. गेट समोर, दापोडी) आणि विशाल दिलीप ओव्हाळ (वय २७, रा. बापू काटे चाळ, वार्ड नं. ०३, जयभीमनगर, दापोडी) यांचा समावेश आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणी आरोपी विनापरवाना आर्थिक फायद्यासाठी ‘तीन पत्ती’ नावाचा जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून जुगारासाठी वापरण्यात आलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.