खुनाचा प्रयत्न करुन फरार झालेल्या आरोपीला अटक,  मालमत्ता विरोधी गुन्हे शाखेची कामगिरी

खुनाचा प्रयत्न करुन फरार झालेल्या आरोपीला अटक, मालमत्ता विरोधी गुन्हे शाखेची कामगिरी

  खुनाचा प्रयत्न करुन फरार झालेल्या आरोपीला अटक, मालमत्ता विरोधी गुन्हे शाखेची कामगिरी 

पिंपरी, ता. १५ - दिघीमध्ये  १३ मे रोजी खुनाचा प्रयत्न करुन फरार झालेल्या मुख्य आरोपीला मालमत्ता विरोधी गुन्हे शाखेच्या पथकाने १४ जून रोजी पुन्हा दिघीतून अटक केली आहे. त्याच्याकडून १ पिस्तूल व १ जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. अटक आरोपीचे नाव शेखर संभाजी जाधव असे आहे. आरोपीविरुद्ध ७० हून अधिक चोरीचे गुन्हे दाखल आहेत. 

दिनांक १३ मे २०२६ रोजी दिघी पोलिसस्टेशन हद्दीत फायरिंग करून खुनाचा प्रयत्न करणारा आरोपी शेखर संभाजी जाधव व इतर तिघे गुन्हा केल्यापासून फरार होते. त्यांच्याविरुद्ध दिघी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम १०९,११५ (२), ३५२, 349(2), 3(4) शस्त्र अधिनियम कलम ३, २५, २७ महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ क्रिमीनल लॉ अमेण्डमेन्ट अॅक्ट कलम ७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. 

या गुन्ह्याचा तांत्रिकदृष्टया तपास करताना दिनांक १६ मे २०२६ रोजी  गुन्ह्यातील मुख्य आरोपी शेखर संभाजी जाधव व मुस्तफा (भाईजान) हे रांजणगाव येथे असल्याची  माहिती मिळाली होती. त्याला ताब्यात घेण्यासाठी गेलल्या गुन्हे शाखेच्या पथकावर आरोपींनी  फायरिंग करुन पळून गेले होते. त्याबाबत पुणे ग्रामीण रांजणगाव पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम  १०९,१३२, ३ (५), शस्त्र अधिनियम कलम ३, २५, क्रिमीनल लॉ अमेण्डमेन्ट अॅक्ट कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

तपास पथकाने तीन वेळा नांदेड हिंगोली व लातूर जिल्ह्यात जाऊन आरोपीबाबत तपास करुन गोपनीय बातमीदार तयार करून मुख्य आरोपी शेखर जाधव याचेबाबत माहिती घेतली असता तसेच त्याचेबाबत तांत्रिक तपास केला असता त्यानंतर मिळालेल्या बातमीवरुन मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने दिनांक १४ जून २०२६ रोजी दिघीतील मोझे शाळेजवळील मोकळ्या मैदानात आरोपी शेखर संभाजी जाधव (वय २५ वर्षे, रा. ता. उदगीर, जि. लातूर) हा पिस्तूलासह मिळाला. त्याच्याकडे ५१ हजार रुपयांचे लोखंडी देशी बनावटीचे पिस्तूल व १ जिवंत काडतूस (राऊंड) सोबत बाळगले होते. 

पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याविरूध्द दिघी पोलिस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम ३, २५, महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. त्याला पुढील कार्यवाहीसाठी दिघी पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलिस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड, पोलिस उप-आयुक्त, गुन्हे रोहिदास पवार, सहायक पोलिस आयुक्त - गुन्हे १ डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग देवकाते, गोरक्षनाथ बालवडकर, पोलिस उपनिरीक्षक महेश खांडे, पोलिस अंमलदार नितीन उमरजकर, हर्षद कदम, गणेश कोकणे, गणेश सावंत, विनोद वीर, गणेश हिंगे, नितीन लोखंडे, सोमनाथ मोरे, चंद्रकांत गडदे, मोहसीन अत्तार, अमर कदम, समीर रासकर, विशाल गायकवाड, ध्यानेश्वर कोळगे, अमोल गोरे, औदुंबर रोंगे यांच्या पथकाने केली आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories