बंजारा समाजाला समाजमंदिर उभारण्यासाठी शहरात जागा उपलब्ध करुन द्यावी, बंजारा समाज संस्थेची मागणी

बंजारा समाजाला समाजमंदिर उभारण्यासाठी शहरात जागा उपलब्ध करुन द्यावी, बंजारा समाज संस्थेची मागणी

बंजारा समाजाला समाजमंदिर उभारण्यासाठी शहरात जागा उपलब्ध करुन द्यावी, बंजारा समाज संस्थेची मागणी 

पिंपरी, ता. २ जुलै २०२६ -  पिंपरी-चिंचवड शहरात बंजारा समाज हा लाखोंच्या संख्येने वास्तव्यास आहे. बंजारा समाजबांधवाना त्यांचे सण-उत्सव साजरे करण्यासाठी समाज मंदिर किंवा बंजारा भवन बांधण्यासाठी शहरातील जागा आरक्षित करुन द्यावी, अशी मागणी अखिल बंजारा समाज सेवा संस्थेने केली आहे. याबाबत संस्थेचे पदाधिकारी प्रेम पवार, आकाश चव्हाण, गीता चव्हाण यांनी महापौर रवी लांडगे यांना निवेदन दिले आहे. 

या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात बंजारा समाज हा लाखोंच्या संख्येने वास्तव्यास आहे. उदरनिर्वाहासाठी शहरात आलेल्या बंजारा समाजाच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. बंजारा समाज हा आपली संस्कृती जपणारा समाज असून होळी, तीज, संत सेवालाल जयंती, स्व. वसंतरावजी नाईक साहेब (माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) जयंती असे उत्सव दरवर्षीं गल्ली बोळात व जागा मिळेल त्या ठिकाणी साजरा करीत असतो. मात्र,  शहरात बंजारा समाजास आपले उत्सव साजरे करण्यासाठी कोणतेही हक्काचे ठिकाण नाही याचा खेद वाटतो. 

त्यामुळे बंजारा समाज बांधवांना आपले कार्यक्रम एकत्रित साजरे करण्यासाठी बंजारा भवन किंवा समाज मंदिर बांधण्यासाठी जागा आरक्षित करून देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी आणि त्याबाबतचा ठराव महापालिकेत मंजूर करून पुढील योग्य ती कार्यवाही करावी. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories