news
clock
भगवान महावीर जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड जैन महासंघातर्फे शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

भगवान महावीर जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड जैन महासंघातर्फे शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

 भगवान महावीर जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड जैन महासंघातर्फे शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

धार्मिक कार्यक्रम, आरोग्य शिबिरे, संगीत मैफल व अहिंसा पुरस्कार वितरण सोहळा 

पिंपरी, ता. २५ - भगवान महावीर जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड जैन महासंघाच्या वतीने २५ ते ३१ मार्च या कालावधीत अहिंसा सप्ताह साजरा केला जाणार आहे. सप्ताहामध्ये धार्मिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक कार्यक्रम होणार आहेत. महोत्सवाची सुरुवात बुधवारी (ता. २५) कासारवाडी येथील प्यारीबाई पगारिया सभागृहात सकाळी भक्तामर पठणाने होत आहे. 

गुरुवारी (ता. २६) स्वानंद महिला संस्थेतर्फे बिजलीनगर येथे पाणपोई उद्घाटन व जैन श्रावक संघ निगडी प्राधिकरणच्या वतीने गौतम प्रसादी भवनाचे उ‌द्घाटन व अन्नधान्य वाटप होणार आहे. शुक्रवारी (ता. २७) पिंपळे निलख येथील सावित्रीबाई फुले उद्यानात वृक्षारोपण करुन तीर्थंकर वाटिकेचे उद्घाटन तसेच आकुर्डी येथे प्रश्नमंजूषा व पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. शनिवारी (ता. २८) दापोडी येथे आनंद चालीसा, वायसीएम रुग्णालयात 'आनंद की रोटी' उपक्रम, पिंपळे सौदागर येथे चित्रकला स्पर्धा, निगडी येथे पाककला स्पर्धा आणि तेरापंथी भवनात जाप व सामायिक कार्यक्रम होणार आहेत.

रविवारी (ता. २९) चिंचवड स्टेशन येथे उत्तराध्ययन सूत्र आराधना, विविध ठिकाणी रक्तदान, नेत्र चिकित्सा, आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप शिबिरे, आयुर्वेदिक व कर्करोग तपासणी शिबिरे, खाऊ व फळवाटप, तसेच ज्ञानप्रबोधिनी शाळेत भक्तिगीत स्पर्धा व कार्यकर्त्यांचा सन्मान होणार आहे. पिंपळे सौदागर येथे रक्तदान शिबिर व 'महावीर रोटी' उपक्रम, तर निगडी येथे सांस्कृतिक कार्यक्रम व धान्य वाटप होणार आहे. सोमवारी (ता. ३०) निगडी येथील भगवान महावीर दिगंबर जैन मंदिरात नेत्रदान नोंदणी, रक्तदान व कर्करोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. 

मंगळवारी (ता. ३१) भगवान महावीर जयंती दिन आहे. मंगळवारी महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी नवी सांगवी येथील संस्कृती लॉन्स येथून दुपारी ३ वाजता भव्य अहिंसा रॅलीला सुरुवात होईल. शहरातील विविध प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत ही रॅली फेमस चौक, क्रांती चौक, कृष्णा चौक, साई चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जुनी सांगवी, गजानन महाराज मंदिर, दापोडी, नाशिक फाटा, विशाल टॉकीज, चाफेकर चौक, वाल्हेकरवाडी, चिंतामणी चौक मार्गे पार्श्वनाथ चौक, बिजलीनगर येथे पोहोचेल. सायंकाळी पाच वाजता अहिंसा पदयात्रा काढण्यात येईल. निगडीतील ग. दि. माडगूळकर सभागृहात सायंकाळी भक्तिसंध्या, सांस्कृतिक कार्यक्रम आणि 'अहिंसा पुरस्कार' वितरण सोहळा होईल. जालना येथील मेहुलभाई रुपडा यांची भक्तिगीतांची मैफल विशेष आकर्षण ठरणार आहे.

सर्व कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे

आवाहन जैन महासंघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया, कार्याध्यक्ष विजय भिलवडे, स्वागताध्यक्ष किरणभाई शहा, कोषाध्यक्ष नैनसुख मांडोत, महामंत्री संदीप फुलफगर, वरिष्ठ उपाध्यक्ष दिलीप भन्साळी, प्रकाश गादिया, उपाध्यक्ष शांतीनाथ पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories