news
clock
घरगुती घातक कचऱ्याबाबत महापालिकेने धोरण निश्चित करावे, पुणे डिस्ट्रिक्ट केमिस्ट असोसिएशनची मागणी

घरगुती घातक कचऱ्याबाबत महापालिकेने धोरण निश्चित करावे, पुणे डिस्ट्रिक्ट केमिस्ट असोसिएशनची मागणी

घरगुती घातक कचऱ्याबाबत महापालिकेने धोरण निश्चित करावे, पुणे डिस्ट्रिक्ट केमिस्ट असोसिएशनची मागणी

असोसिएशनने सुचवल्या प्रभावी उपाययोजना, महापालिकेला सहकार्य करण्याची भूमिका

पिंपरी, ता. २५ - सध्या पिंपरी-चिंचवड शहरात घराघरांतून निर्माण होणाऱ्या 'घरगुती घातक कचऱ्या'मध्ये   वापरलेली औषधे आणि इन्सुलिन सिरिंज मोठ्या प्रमाणात आढळत आहे. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांच्या तसेच मोकाट जनावरांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. यावर उपाय म्हणून शहरात 'मेडिसीन ड्रॉप बॉक्स' ही प्रभावी योजना पुणे डिस्ट्रिक्ट केमिस्ट असोसिएशन महापालिकेला सुचवत आहे. महापालिकेने या विषयाची गांभिर्याने दखल घेऊन याबाबत तातडीने धोरण निश्चित करावे, अशी मागणी 

पुणे डिस्ट्रिक्ट केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष विवेक तापकीर यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यंवशी यांच्याकडे केली आहे. 

याबाबत, त्यांनी असोसिएशनच्या वतीने डॉ. सूर्यंवशी यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सध्या पिंपरी-चिंचवड शहरात घराघरांतून निर्माण होणाऱ्या 'घरगुती घातक कचऱ्या'मध्ये  मोठ्या प्रमाणात वापरलेली औषधे आणि इन्सुलिन सिरिंजचा समावेश होत आहे. याकडे गांभीर्याने पाहणे काळाची गरज आहे. 

अनेक रुग्ण घरीच इन्सुलिन किंवा अन्य इंजेक्शन घेतात. वापरलेल्या सुया (Needles) थेट ओल्या किंवा सुक्या कचऱ्यात टाकल्या जातात. यामुळे कचरा वेचणारे कर्मचारी, महानगरपालिकेचे सफाई कामगार यांना 'नीडल स्टिक इंज्युरी' होऊन जीवघेण्या आजारांचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. घरातील मुदत संपलेली औषधे कचऱ्यात किंवा सांडपाण्यात टाकल्यामुळे ती जमिनीतील पाणी दूषित करतात. तसेच, जर ही औषधे चुकून कचऱ्यातील प्राण्यांच्या पोटात गेली किंवा कुणी अनावधानाने वेचली, तर त्याचे गंभीर विषबाधेत रुपांतर होऊ शकते. कचरा डेपो किंवा रस्त्यांवरील कचऱ्यात मिसळलेल्या टोकदार सुया आणि औषधांमुळे भटक्या जनावरांना (गाय, कुत्री इ.) अपंगत्व येणे किंवा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. तसेच अँटीबायोटिक्स औषधे उघड्यावर टाकल्याने पर्यावरणात 'सुपरबग्स' निर्माण होण्याचा धोका असतो. यामुळे भविष्यात वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठे आव्हान निर्माण होऊ शकते. 

वरील महत्वाचा प्रश्न सोडवून सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आम्ही केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट आणि साई मल्हार सोशल फाउंडेशनच्या वतीने महापालिकेला सहकार्य करण्यासाठी तत्पर आहोत आणि उपाययोजना सुचवत आहोत. त्यानुसार, महापालिकेने सदर निवेदनाची दखल घेऊन महानगरपालिका स्तरावर तातडीने धोरण निश्चित करावे, अशी आग्रही मागणी तापकीर यांनी केली आहे.

केमिस्ट असोसिएशनने सुचवलेल्या उपाययोजना - 

* संकलन केंद्र (Collection Points): शहरातील प्रमुख औषधालयांमध्ये (Chemist Shops) 'मेडिसिन ड्रॉप बॉक्स' बसवण्यात यावेत. नागरिक आपली न वापरलेली किंवा मुदत संपलेली औषधे आणि सुरक्षितपणे बंद केलेली सिरिंज तिथे जमा करतील.

* महानगरपालिकेची भूमिका : महानगरपालिकेच्या 'बायो-मेडिकल वेस्ट' वाहनांनी या औषधालयांतून नियमितपणे हा कचरा संकलित करावा आणि त्याची शास्त्रोक्त पद्धतीने (Incineration) विल्हेवाट लावावी.

* जनजागृती : औषध विक्रेत्यांच्या माध्यमातून नागरिकांना औषधांच्या सुरक्षित विल्हेवाटीबाबत नागरीकांमध्ये प्रबोधन केले जाईल. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories