news
clock
पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना शुद्ध, मुबलक व शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना शुद्ध, मुबलक व शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना शुद्ध, मुबलक व शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे. 

भामा-आसखेड धरण पाणीपुरवठा योजना प्रकल्पाची महापौरांनी केली पाहणी 

पिंपरी, ता. २६ - पिंपरी-चिंचवड शहराच्या भविष्यातील पाण्याच्या गरजा लक्षात घेता भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करा, असे निर्देश महापौर रवी लांडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

भामा-आसखेड धरण पाणीपुरवठा योजना प्रकल्पाची आज महापौरांनी नुकतीच प्रत्यक्ष पाहणी करुन सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी बोलत होते. या पाहणी दरम्यान उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शहर सुधारणा समिती सभापती संजय काटे, नगरसदस्य धर्मपाल तंतरपाळे, कुणाल वाव्हळकर, शेखर चिंचवडे,नवनाथ जगताप यांच्यासह महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता अनिल भालसाखळे, महेश कावळे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

या पाहणीमध्ये मौजे-वाकीतर्फे वाडा येथे उभारण्यात येत असलेल्या अशुद्ध जल उपसा केंद्राच्या कामाची त्यांनी पाहणी केली.  तेथून दररोज १६७ दशलक्ष लिटर पाणी कशा प्रकारे शहरासाठी उपलब्ध होणार आहे याची माहिती घेतली. या उपसा केंद्रापासून तळेगाव येथील ब्रेक प्रेशर टँकपर्यंत टाकण्यात येणाऱ्या ७.३० किलोमीटर लांबीच्या १७०० मि.मी. व्यासाच्या रायझिंग मेन जलवाहिनीच्या कामाच्या प्रगतीचाही आढावा घेतला.

 नऊलाख उंब्रे येथील ब्रेक प्रेशर टँकच्या उभारणी संदर्भात आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती घेत महापौरांनी लवकरात लवकर प्रत्यक्ष बांधकाम सुरु करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत टाकण्यात येणाऱ्या १८.८० किलोमीटर लांबीच्या १४०० मि.मी. व्यासाच्या ग्रॅव्हिटी मेन जलवाहिनीच्या कामाचाही त्यांनी आढावा घेतला.  चिखली येथे उभारण्यात येणाऱ्या २०० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाची माहिती घेताना महापौरांनी हायड्रॉलिक, जीआय आणि स्ट्रक्चरल डिझाईनबाबत अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली.

पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार .....

''पिंपरी चिंचवड शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेता भामा आसखेड पाणीपुरवठा  प्रकल्पामुळे शहरातील अनेक भागांतील पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार आहे. त्यामुळे प्रकल्पातील सर्व कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे. कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही याची संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी.'' -  महापौर रवी लांडगे 

भामा-आसखेड प्रकल्प शहरविकासाठी निर्णायक

''शहरातील पाणीपुरवठा हा अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय असून, भामा-आसखेड प्रकल्पाच्या माध्यमातून भविष्यातील पाणी गरजांची पूर्तता करण्यासाठी भक्कम पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत.

आसखेड प्रकल्प हा शहराच्या दीर्घकालीन विकासासाठी निर्णायक ठरणार असून, या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही. नागरिकांना नियमित व मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध करुन देणे हे प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून, त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबविण्यात येतील.'' - डॉ. विजय सूर्यवंशी, महापालिका आयुक्त

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories