news
clock
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शहराध्यक्षपदी विलास कांबळे यांची निवड

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शहराध्यक्षपदी विलास कांबळे यांची निवड

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शहराध्यक्षपदी विलास कांबळे यांची निवड

पत्रकार परिषदेत पक्षाची नवीन पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारणी जाहीर 

पिंपरी, ता. २६ -  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची पिंपरी-चिंचवड शहर नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष पदावर विलास कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. सरचिटणीसपदी दयानंद वाघमारे, कार्याध्यक्षपदी बाळासाहेब रोकडे आणि लिंबराज कांबळे, वरिष्ठ उपाध्यक्षपदी दिलीप नाना साळवे यांना संधी देण्यात आली आहे. 

 बुधवारी (ता. २५) पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आरपीआय प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत व पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष के. एम. बुक्तर यांनी ही माहिती दिली. पत्रकार परिषदेस सरचिटणीस खाजाभाई शेख, पश्चिम महाराष्ट्र सचिव रमेश चिमूरकर, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष अंकुश कानडी, जेष्ठ आरपीआय नेत्या लता ओव्हाळ, व्यापारी आघाडी उपाध्यक्ष दत्तात्रय गायकवाड, महिला शहराध्यक्ष कमलताई कांबळे यांच्यासह नवनियुक्त कार्यकारणी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. 

''भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पाईक असणारा मोठा वर्ग पिंपरी चिंचवड शहरात वर्षानुवर्ष कार्यरत आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिव, फुले, शाहू यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम पिंपरी चिंचवड शहरात करीत आहोत, हेच काम आणखी जोमाने करण्यासाठी नवीन कार्यकारणी तत्पर असेल.'' असे आरपीआय प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत यांनी सांगितले. 

आरपीआय पश्चिम महाराष्ट्र सचिव रमेश चिमूरकर म्हणाले, ''गेल्या ३० ते ४० वर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार शहरात रुजवणारे व चळवळीमध्ये काम केलेले जेष्ठ वरिष्ठ पॅंथर कार्यकर्ते आणि नव्याने चळवळीत सहभाग घेणारे युवा पॅंथर यांना एकत्र करुन नवीन कार्यकारणी निवडण्यात आली आहे.''

''शहरातील सामान्य, गोरगरीब, दुर्लक्षित, वंचित, झोपडीधारकांना न्याय देण्यासाठी नवीन कार्यकारणी सक्षमपणे काम करेल. वेळप्रसंगी धार्मिक व राजकीय प्रश्नांवर देखील रस्त्यावर उतरुन आरपीआय आंदोलन करेल, सर्व वरिष्ठ पदाधिकारी नव्या कार्यकारणीला मार्गदर्शन करतील.'', असे आरपीआयच्या वरिष्ठ नेत्या माजी नगरसेविका लता ओव्हाळ म्हणाल्या.

आरपीआय पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी नव्याने नियुक्त झालेले विलास कांबळे यांनी नवीन कार्यकारिणी सदस्यांची नावे जाहीर केली. उपाध्यक्ष बाळासाहेब जोगदंड, रमेश गजरमल, विशाल कदम, रघु गव्हाळे, प्रकाश बुक्तर, अशोक कांबळे, सुरेश आठवले, नंदू मस्के; पक्षप्रवक्ता भारत बनसोडे, संपर्क प्रमुख विकास कडलक, प्रसिद्धी प्रमुख अभिजीत चव्हाण, सदस्य सुंदर कांबळे, संघटक पांडुरंग कांबळे, दुर्गाप्पा देवकर, सह संघटक सुभाष मस्के, शरणू नाटेकर, सहसचिव तुकाराम गायकवाड, सचिव बालाजी जाधव, सल्लागार गोरख गायकवाड, विठ्ठल माने यांचा नवीन कार्यकारिणीत समावेश आहे. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories