news
clock
शहरातील कलाकारांसाठी साकारलाय रंगमंच .....'भरतमुनी रंगघन'

शहरातील कलाकारांसाठी साकारलाय रंगमंच .....'भरतमुनी रंगघन'

शहरातील कलाकारांसाठी साकारलाय रंगमंच .....'भरतमुनी रंगघन' 

पिंपरी, ता. २४ - गुढीपाडव्यानिमित्त 'भरतमुनी रंगघन' या समीप रंगमंचाचे उद्घाटन करण्यात आले. उपमहापौर शर्मिला बाबर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते नाटकाची तिसरी घंटा देऊन रंगमंचाचे उद्घाटन झाले. शहरातील कलाकारांना प्रायोगिक तसेच व्यावसायिक नाट्य, नृत्याविष्कार आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी 'भरतमुनी रंगघन' रंगमंच साकारला आहे.

या प्रसंगी ज्येष्ठ सिनेमा दिग्दर्शक मिलिंद लेले, नाट्य-चित्रपट निर्माते प्रद्योत पेंढारकर, नगरसेवक शेखर चिंचवडे, सिने-अभिनेता पुष्कराज चिरपुटकर, नरेंद्र पेंडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शहरात अशा प्रकारचा रंगमंच पहिल्यांदाच साकार होत असून १८०, ३६० अंशांमध्ये रसिक प्रेक्षक कला सादरीकरणाचा आनंद घेऊ शकणार आहेत. 

उद्घाटनानिमित्त 'रंगविभोर' प्रस्तुत 'अमृतपुत्र' हा नाट्य, नृत्य आणि गायनाचा संगम असलेला कार्यक्रम सादर करण्यात आला. राष्ट्रीय पुरस्कार विजेते माधव जोगळेकर यांच्या लेखन व दिग्दर्शनाखाली सादर झालेल्या या कार्यक्रमाने रसिकांना खिळवून ठेवले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories