news
clock
जैन सोशल ग्रुप तळेगाव दाभाडेच्या अध्यक्षपदी इंद्रकुमार सोलंकी

जैन सोशल ग्रुप तळेगाव दाभाडेच्या अध्यक्षपदी इंद्रकुमार सोलंकी

जैन सोशल ग्रुप तळेगाव दाभाडेच्या अध्यक्षपदी इंद्रकुमार सोलंकी

पिंपरी, ता. २४ - जैन सोशल ग्रुप तळेगाव दाभाडेच्या अध्यक्षपदी इंद्रकुमार सोलंकी यांची तर सचिवपदी निलेश जैन यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी समीर परमार आणि खजिनदारपदी देवेंद्र शहा यांची निवड करण्यात आली आहे.

जैन सोशल ग्रुपच्या माध्यमातून दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात.  माजी अध्यक्ष किरण ओसवाल आणि मावळते अध्यक्ष हितेश राठोड यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली. यावेळी, येत्या मंगळवारी (ता. ३१) भगवान महावीर स्वामी यांच्या जन्मकल्याण दिनानिमित्त जैन भवन, बाजारपेठ येथे सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सोलंकी व प्रकल्प चेअरमन किरण ओसवाल यांनी दिली. 

यावेळी माजी अध्यक्ष राजेंद्र शहा, राकेश ओसवाल, संजय सोलंकी, संजय पालरेषा, दिनेश वाडेकर आणि घनश्याम राठोड आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories