भोसरी–दिघी परिसरात मु्ख्य मलवाहिनी बदलण्याच्या कामामुळे वाहतूकीत तात्पुरता वाहतूक बदल
पिंपरी, ता. २८ जुलै २०२६ - भोसरी–दिघी परिसरात संत निरंकारी भवन समोरील इंद्रधनू सोसायटीसमोर मुख्य मलवाहिनी बदलण्याचे काम महापालिकेने तातडीने हाती घेतले आहे. हे काम अत्यंत तांत्रिक, महत्त्वाचे आणि जोखमीचे असल्यामुळे सुमारे १५ ते २० फूट खोलीपर्यंत उत्खनन करावे लागणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत या मार्गावरील वाहतूक पुढील ४ ते ५ दिवस पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
संत निरंकारी भवन समोरील मुख्य ड्रेनेज मलवाहिनी चोकअप झाल्यामुळे शिवनगरी परिसरातील अनेक घरांमध्ये मैलापाणी शिरण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
या समस्येचे कायमस्वरूपी व प्रभावी निराकरण करण्यासाठी महापालिकेने संत निरंकारी भवन समोरील इंद्रधनू सोसायटीसमोर मुख्य मलवाहिनी बदलण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत या मार्गावरील वाहतूक पुढील ४ ते ५ दिवस पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत कृपया पर्यायी मार्गांचा वापर करून महानगरपालिकेला सहकार्य करावे. असे महापालिकेने व आमदार महेश लांडगे यांनी सांगितले आहे.