कृष्णानगर स्पाईन रस्त्यावर पसरलेय खड्ड्यांचे साम्राज्य....,आठवडाभरात खड्डे बुजवण्याची मागणी

कृष्णानगर स्पाईन रस्त्यावर पसरलेय खड्ड्यांचे साम्राज्य....,आठवडाभरात खड्डे बुजवण्याची मागणी

 कृष्णानगर स्पाईन रस्त्यावर पसरलेय खड्ड्यांचे साम्राज्य....,आठवडाभरात खड्डे बुजवण्याची मागणी

पिंपरी, ता. २८ जुलै २०२६ - कृष्णानगर स्पाईन रोडवर (प्रभाग क्रमांक ११ ) खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. महापालिका प्रशासनाने याची नोंद घेऊन तातडीने खड्डे योग्य पद्धतीने बुजवावेत, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मारुती जाधव यांनी केली आहे.  

या रस्त्याची दुरवस्था जाधव यांनी निदर्शनास आणून दिली आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत वारंवार तक्रारी करूनही अधिकारी दुर्लक्ष करतात. गेल्या वर्षी पावसाळ्यामध्ये याच खड्ड्यांमध्ये नागरिकांनी झाडांच्या फांद्या उभारुन निषेध नोंदवला होता. मात्र, यंदाही रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. 

महानगरपालिकेचा दावा आहे की शहरांमध्ये 560 खड्डे आहेत आणि वर्षभरात खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी दीडशे कोटी रुपये खर्च केलेला आहे परंतु हे दीडशे कोटी रुपये नेमके कुठे, खर्च झाले आहेत ....याची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर करावी. 

येत्या आठवडाभरात या खड्ड्यांची दुरुस्ती झाली नाही तर आम्ही नागरिक या खड्ड्यांचे भावपूर्ण श्रद्धांजली आंदोलन करणार आहोत, असे जाधव यांनी सांगितले.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories