भोसरीत अल्पवयीन गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

भोसरीत अल्पवयीन गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

भोसरीत अल्पवयीन गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

पिंपरी, ता. २९ - भोसरी एमआयडीसी परिसरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका अल्पवयीन गुन्हेगाराकडून  ताब्यातून गावठी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त केले. या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यासह महाराष्ट्र पोलिस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. २८) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास क्रांती चौकाकडून पंतप्रधान आवास योजनेकडे जाणाऱ्या रस्त्यालगत शिर्के कन्स्ट्रक्शन लेबर कॅम्पजवळ संशयिताची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस, असा एकूण ४० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत २४ जून ते ७ जुलै २०२६ या कालावधीत घातक शस्त्रे व अग्निशस्त्रे बाळगण्यास मनाईचे आदेश लागू असतानाही संबंधित बालकाने या आदेशाचे उल्लंघन केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी पोलीस हवालदार बाजीराव भगवान सानप यांनी फिर्याद दिली असून भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१), ३७(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अल्पवयीन गुन्हेगाराला नोटीस बजावली आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories