संघटन सक्षम करण्यासाठी पिंपरी-चिंचवड भाजपच्या विविध आघाड्यांतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्यांचे वाटप

संघटन सक्षम करण्यासाठी पिंपरी-चिंचवड भाजपच्या विविध आघाड्यांतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्यांचे वाटप

संघटन सक्षम करण्यासाठी पिंपरी-चिंचवड भाजपच्या विविध आघाड्यांतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्यांचे वाटप 

पिंपरी, ता. २२ -  चिंचवडचे आमदार शंकर जगताप व भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी-चिंचवड भाजपच्या विविध आघाड्या व प्रकोष्ठांचा 'नियुक्तीपत्र प्रदान समारंभ' नुकताच पार पडला. संघटन अधिक सक्षम, प्रभावी आणि समाजाभिमुख करण्याच्या उद्देशाने विविध क्षेत्रांतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या. मोरवाडी येथील भाजप मध्यवर्ती कार्यालयात हा समारंभ झाला.  कार्यकारिणी नियुक्ती प्रदान समारंभात भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न  काटे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत पक्षाचे कार्य समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.

चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात वैद्यकीय प्रकोष्ठ, अभियांत्रिकी प्रकोष्ठ, ओबीसी मोर्चा, वक्तृत्व प्रशिक्षण प्रकोष्ठ आणि दिव्यांग सेलच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

यावेळी बोलताना शत्रुघ्न काटे म्हणाले, “भाजप हा सर्वसमावेशक आणि कार्यकर्त्यांच्या बळावर उभा असलेला पक्ष आहे. नव्याने नियुक्त झालेल्या प्रकोष्ठांमध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींना संधी देण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजना आणि भाजपची विचारधारा पिंपरी-चिंचवडमधील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल, असा मला विश्वास आहे. आगामी काळात संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी समर्पित भावनेने काम करावे.”

काटे यांच्या हस्ते आणि आमदार शंकरशेठ जगताप यांच्या उपस्थितीत चेतन भुजबळ (अध्यक्ष, ओबीसी मोर्चा), डॉ. अमित नेमाने (अध्यक्ष, वैद्यकीय प्रकोष्ठ), संतोष भालेराव (अध्यक्ष, अभियंता प्रकोष्ठ), हरीश आप्पा मोरे (संयोजक, वक्तृत्व प्रशिक्षण प्रकोष्ठ) आणि अंकुश शिर्के (अध्यक्ष, दिव्यांग सेल) यांना नियुक्तीपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमास संघटन सरचिटणीस मोरेश्वरभाऊ शेडगे, सरचिटणीस मधुकरभाऊ बच्चे, सरचिटणीस वैशालीताई खाडये, वरिष्ठ उपाध्यक्ष संजयभाऊ पटनी, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेशभाऊ यादव, अनुप मोरे, राजू दुर्गे यांच्यासह भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते, आजी-माजी नगरसेवक, विविध आघाड्यांचे प्रमुख, मंडल अध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जनसेवा हेच ध्येय....

“भाजप हा कार्यकर्त्यांच्या बळावर उभा असलेला सर्वसमावेशक पक्ष आहे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना संघटनेत जबाबदारी देऊन समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पक्षाची विचारधारा आणि केंद्र-राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजना पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी संघटन विस्तार आणि जनसेवा हेच ध्येय ठेवून जोमाने कामाला लागावे.”

— शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजप



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories