'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट'ची शाखा पिंपरी-चिंचवडमध्ये होणार

'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट'ची शाखा पिंपरी-चिंचवडमध्ये होणार

'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट'ची शाखा पिंपरी-चिंचवडमध्ये होणार 

पिंपरी, ता. २२ -  देशातील सर्वोच्च व्यवस्थापन संस्था 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट' (IIM)ची शाखा पिंपरी-चिंचवड शहरात आता उभारली जाणार आहे. 'आयआयएम'च्या विस्तारीत शाखेसाठी मोशी येथील शासकीय जागा 'निशुल्क' देण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारच्या कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली आहे,  अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली. 

'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट'ची विस्तारीत शाखा मोशी येथे होणार असल्याने पिंपरी-चिंचवडच्या वैभवात मोठी भर पडणार आहे. आयटी हब, औद्योगिक पट्टा आणि उत्तम 'कनेक्टिव्हिटी'मुळे नवीन शाखेची मोशीची निवड कण्यात आली आहे. आयआयएम नागपूरची विस्तारीत शाखा पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे व्हावी, यासाठी महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय आणि महसूल विभाग यांनी यासाठी सकारात्मकता दर्शवली होती. आता राज्य सरकारच्या कॅबिनेट मंत्रीमंडळाची मंजुरी मिळाली आहे.

आमदार महेश लांडगे म्हणाले, ''आम्ही केलेल्या सातत्यपूर्ण मागणीला आणि पाठपुराव्याला आज मोठे यश आले आहे. पिंपरी-चिंचवडला देशातील अग्रगण्य 'एज्युकेशन हब' बनवणे हा आमचा संकल्प आहे. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीपासूनच आम्हास सकारात्मक पाठबळ दिले. उद्योग, आयटी आणि उच्च शिक्षण यांचा हा त्रिवेणी संगम शहराच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी ठरेल.''


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories