गॅस सिलिंडरची चोरुन चढ्या दराने विक्री करणाऱ्या इसमाला पोलिसांनी बजावली नोटिस
पिंपरी, ता. ६ - मौजे चाकण गावच्या हद्दीत गॅस सिलिंडरची चोरुन चढ्या दराने विक्री करणाऱ्या इसमाला पोलिसांनी नोटीस बजावली आहे. रुपये ६९ हजारांच्या २३ गॅस सिलिंडरच्या टाक्या हा आरोपी गुरुवारी (ता. ४) टेम्पोतून नेत होता. मौजे चाकण गावात पोलिसांनी त्याला पकडले. विवेक लालमन गुप्ता (वय ४५ वर्षे, रा. चाकण) असे आरोपीचे नाव आहे.
४ जूनला सायंकाळी पावणे आठच्या सुमारास आरोपी ६९,०००/- रुपये किंमतीच्या २३ भरलेल्या गॅस सिलेंडर टाक्या अवैधरित्या चढ्याभावाने विक्री करण्याच्या उद्देशाने नेत होता. या गॅस सिलिंडर टाक्या व १ लाख रुपयांचा पिवळ्या रंगाची पॅगो कंपनीचा टेम्पो असा एकूण १ लाक ६९ हजार रुपयांचा माल आरोपीकडून पोलिसांनी जप्त केला.
आरोपीला बीएनएसएस ३५(३) प्रमाणे नोटिस दिली आहे. त्याच्यावर उत्तर चाकण पोलिस ठाण्यात बी.एन.एस. कलम ३१८ (४),२८७, सह जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३,७ सह (पुरवठा व वितरण नियमन) आदेश २००० चे कलम ३,४.५.६. ७. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.