तळवडेतील हॉटेलमधून ५२ हजार ६९० रुपयांचा देश-विदेशी मद्यसाठा जप्त

तळवडेतील हॉटेलमधून ५२ हजार ६९० रुपयांचा देश-विदेशी मद्यसाठा जप्त

तळवडेतील हॉटेलमधून ५२ हजार ६९० रुपयांचा देशा-विदेश मद्यसाठा जप्त

पिंपरी, ता. ६ - पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत ५२ हजार ६९० रुपयांचा देशा-विदेश मद्यसाठा जप्त केला. ही कारवाई तळवडे-देहूरोड येथील कॅनबे चौक जवळ शिवरत्न हॉटेलमध्ये शुक्रवारी (ता. ५) करण्यात आली. आरोपींवर  देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत, पोलीस शिपाई गोविंद देवराव डोके (वय ३५) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार गजानन भगवान हिप्परकर (वय २७, रा. गणेशनगर, स्पाइन रोड, तळवडे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला बीएनएसएस कलम ३५ (३) अन्वये नोटीस देण्यात आली आहे. तसेच दुसरा आरोपी हॉटेलचा मालक विशाल तुकाराम भालेकर (वय अंदाजे ४०, रा. स्पाइन रोड, तळवडे) याचा पोलिस शोध घेत आहेत. पोलिसांना छापा टाकला असता आरोपीकडे ५२ हजार ६९० रुपये किमतीचा देशी व विदेशी दारुचा साठा बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी ठेवलेला आढळून आला.

चौकशी केली असता जप्त करण्यात आलेला मद्यसाठा हॉटेल मालक विशाल भालेकर याने विक्रीसाठी उपलब्ध करुन दिला आहे व त्याने सांगितलेल्या दराने दारूची विक्री करत आहे असे आरोपी हिप्परकर याने पोलिसांना सांगितले. आरोपीवर देहूरोड पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories