चाकण महाळुंगे परिसरात अवैध गैस रिफिलिंग व्यवसायावर मोठी कारवाई,  १ लाख ३००/- रुपयांच्या ८१ गॅस सिलिंडरच्या टाक्या जप्त, मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची  कामगिरी

चाकण महाळुंगे परिसरात अवैध गैस रिफिलिंग व्यवसायावर मोठी कारवाई, १ लाख ३००/- रुपयांच्या ८१ गॅस सिलिंडरच्या टाक्या जप्त, मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची कामगिरी

चाकण महाळुंगे परिसरात अवैध गैस रिफिलिंग धंदयावर मोठी कारवाई,  १ लाख ३००/- रुपयांच्या ८१ गॅस सिलिंडरच्या टाक्या जप्त, मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची  कामगिरी

पिंपरी, ता. ३ - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने चाकण महाळुंगे परिसरात अवैध गैस रिफिलिंग धंदयावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत अवैध गॅस रिफिलिंग केलेल्या एकूण १ लाख ३००/- रुपयांच्या ८१ गॅस सिलिंडरच्या टाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपीला अटक केली आहे. 

पोलिस आयुक्त  विनय कुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैधरित्या सुरु असलेल्या धंद्यांवर कठोर कायदेशीर कार्यवाही करणेबाबतचे आदेश दिले होते.  त्यानुसार, मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी त्याचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांना गोपनिय माहिती प्राप्त करुन व आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करुन अवैध धंद्यांबाबत माहिती प्राप्त करुन कायदेशीर कार्यवाही करणेचे आदेश दिले होते.

दिनांक २ जूनला मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला  उत्तर महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलिस स्टेशनच्या हद्दीत हनुमान मंदीराच्या विरुध्दबाजूला खराबवाडी, चाकण महाळुंगे रोड (ता. खेड) येथील जय गणेश भारत गॅस या दुकानामध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंगचा व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, तपास पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता आरोपी सचिन प्रकाश म्हस्करे (वय ३१ वर्षे, रा. खराबवाडी हनुमान मंदीरामागे, खेड) हा एका अल्पवयीन गुन्हेगाराला सोबत घेऊन घरगुती गॅसमधून नोझलच्या साहाय्याने गॅस काढून इतर सिलिंडरमध्ये भरत असल्याचे आढळले. अशा गॅस सिलिंडरचा आरोपीने विक्रीसाठी साठा केला होता. 

आरोपीच्या ताब्यातून अवैध गॅस रिफिलिंग केलेल्या एकूण १ लाख ३००/- रुपयांच्या ८१ गॅस सिलिंडरच्या टाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपीविरुध्द उत्तर महाळुंगे पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम २८७, २८८,  जिवनावश्यक वस्तूचा कायदा १९५५ च्या कलम ३, ७ सह तसेच स्फोटक पदार्थ अधिनियम सन १९०८ च्या कलम ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सदर उल्लेखनीय कामगिरी ही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलिस आयुक्त  विनय कुमार चौबे, सह पोलिस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त  सारंग आवाड,  पोलिस उप-आयुक्त गुन्हे रोहिदास पवार,  सहायक पोलिस आयुक्त - गुन्हे १ डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडुरंग देवकाते, गोरक्षनाथ बालवडकर, श्रेणी पोलिस उप.निरीक्षक महेश खांडे तसेच पोलिस अंमलदार नितीन लोखंडे, गणेश कोकणे, विशाल गायकवाड, विनोद वीर, गणेश सावंत, अमर कदम, गणेश हिंगे यांनी केली आहे.





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories