महापालिकेने थेट पद्धतीने गणवेश खरेदीचा निर्णय रद्द करावा, निविदा प्रक्रिया राबवावी, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांची मागणी

महापालिकेने थेट पद्धतीने गणवेश खरेदीचा निर्णय रद्द करावा, निविदा प्रक्रिया राबवावी, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांची मागणी

महापालिकेने थेट पद्धतीने गणवेश खरेदीचा निर्णय रद्द करावा, निविदा प्रक्रिया राबवावी, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांची मागणी 

पिंपरी, ता. ३ - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या बालवाडी प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शालेय गणवेश, पीटी गणवेश, स्वेटर, मोजे, रेनकोट, दप्तर, वेस्टकोट हातरुमाल हेअर बॅण्ड व रिबीन आदी साहित्य खरेदी करण्यात येत आहेत त्यासाठी तब्बल 40 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. महापालिकेकडून चढ्या दराने गणवेश खरेदी केली जात आहे. या थेट पद्धतीने गणवेश खरेदीचा स्थायी समितीचा निर्णय रद्द करावा व नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी, अशी मागणी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केली आहे.  याबाबत, जगताप यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. 

या निवेदनात म्हटले आहे की,  शिक्षण समितीने दिलेल्या प्रस्तावानुसार स्थायी समितीने शासन मान्यता प्राप्त असलेल्या सोलापूर येथील श्री जगदंबा महिला रेडीमेड ड्रेसेस विविध उत्पादन सहकारी औद्योगिक संस्था मर्यादित या संस्थेकडून वरील साहित्य खरेदीस स्थायी समितीने 22 एप्रिल 2026 ता मान्यता दिली आहे. संस्थेकडून राज्य शासनाद्वारे निश्चित केलेल्या दरानुसार उत्तम दर्जाचे साहित्य उपलब्ध होईल ती संस्था अंध व दिव्यांगांसाठी कार्यरत असून संस्थेच्या माध्यमातून अनेक अंध, दिव्यांग नागरिकाना प्रवाहात आणून रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिले जात आहे. त्यामुळे त्या संस्थेमार्फत साहित्य घेतल्यास महापालिका व्या नावलौकीकात भर पडेल, असा दावा केला जात आहे. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे गणवेश देण्यात आमचा विरोध नाही उलट, महापालिका शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी अशा प्रकारे साहित्य वितरण करणे आवश्यक आहे. मात्र, महापालिकेकडून चढ्या दराने गणवेश खरेदी केली जात असून, ती शहरातील करदात्या नागरिकाच्या पैश्यावर डल्ला मारण्याचा हा प्रयत्न दिसत आहे तब्बल 40 कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा अधिक चांगल्या दर्जाचे साहित्य अध्र्या किमतीमध्ये मिळू सकते त्यातून महापालिकेची मोठी बचत होणार आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आली असून, अशा प्रकारे उधळपट्टी करण्यास आमचा विरोध आहे. त्यामुळे थेट पद्धतीने गणवेश खरेदीचा स्थायी समितीचा निर्णय रद्द करावा. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थायी समितीचे सदस्य संदीप वाघेरे व विकास साने यांनी हे गणवेश खरेदीच्या खर्चाच्या ठरावावर स्वाक्षरी केली नाही. तरीही या प्रस्तावला मंजुरी दिल्याचा खोटा भास निर्माण करून, राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयल केला जात आहे. महापालिकेने निविदा प्रक्रिया राबवून सर्वांत कमी दर देणारा पुरवठादार ठेकेदाराकडून गणवेश खरेदी करावेत. त्या निविदांमध्ये स्पर्धा होऊन महापालिकेच्या कोट्यवधी रुपयाची बचत होणार आहे. या मागणीनुसार कारवाई न केल्यास आंदोलन केले जाईल, असा इशारा जगताप यांनी दिला आहे. 






Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories