'रुपाली चाकणकरांना अटक करा', महिला काँग्रेसची मागणी, पुण्यात आंदोलन
Mar 23 2026
14
'रुपाली चाकणकरांना अटक करा', महिला काँग्रेसची मागणी, पुण्यात आंदोलन
पुणे, ता. २३ - ''भोंदूबाबा खरात यांच्याशी संबंध असलेल्या मंत्र्यांची त्वरित चौकशी करा. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी महिलांच्या चारित्र्याशीच खेळ केला, हा गुन्हा अक्षम्य आहे. त्यामुळे त्यांना अटक करा.'' , अशा मागणीसाठी पुणे शहर महिला काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
रुपाली चाकणकर यांनी महिलांच्या चारित्र्याशीच खेळ केला, हा गुन्हा अक्षम्य आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा भंग आणि महिलांचे शोषण केलेल्या खरात या भोंदूबाबाला संरक्षण दिल्याबद्दल रूपाली चाकणकरांना अटक झालीच पाहिजे. खरात याची ३० दिवसांत चौकशी करा. तसेच खरातच्या गैरकृत्यांत सहभागी असलेल्या मंत्र्यांची त्वरित चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी स्वाती शिंदे यांनी केली.
या आंदोलनात अर्चना शाह, अनिता मकवाना, प्राजक्ता जाधव, रेखा जैन, अंजली सोलापुरे, राजश्री दामले, रुपाली पवार, मनोरमा चौधरी, कल्पना शिंदे, ज्योती अडागळे, अंजली देसाई, सुवर्णा माने, सुरेखा मारणे सहभागी झाल्या.