‘चला मराठी शिकूया’पुस्तकाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते प्रकाशन
पुणे, ता. २४ - मराठी भाषेचा प्रचार-प्रसार तसंच हिंदीभाषिक बांधवांना मराठी भाषा सहज, सोप्या आणि व्यवहार्य पद्धतीने शिकता यावी या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या ‘चला मराठी शिकूया’ या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मंगळवारी (ता. २३) मुंबईमध्ये झाले.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, ''मराठी ही केवळ भाषा नसून महाराष्ट्राच्या संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचे जिवंत प्रतीक आहे. अधिकाधिक नागरिक मराठी भाषेशी जोडले जावेत, परस्पर संवाद अधिक सशक्त व्हावा आणि भाषिक सलोखा व ऐक्य अधिक दृढ व्हावे, या दृष्टीने हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरेल.''