शिवसेनेच्या पिंपरी-चिंचवड शहर प्रवक्तापदी चेतन बेंद्रे यांची नियुक्ती
पिंपरी, ता. ३० - शिवसेनेच्या पिंपरी-चिंचवड शहर प्रवक्ता पदावर चेतन बेंद्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली.
चेतन बेंद्रे हे युवा सेनेत सक्रिय राहून सामाजिक, शैक्षणिक तसेच जनहिताच्या विविध उपक्रमांमध्ये सातत्याने काम करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविली आहे. बेंद्रे यांना नियुक्तीपत्र प्रदान करताना पक्षाच्या उपनेत्या सुलभा उबाळे, युवा सेना सचिव विश्वजीत बारणे, जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर, मावळ लोकसभा मतदारसंघ प्रमुख राजेंद्र तरस, बापू कातळे, युवा सेना जिल्हाप्रमुख सागर पाचर्णे, महानगर प्रमुख राजेश फलके व पदाधिकारी उपस्थित होते.
चेतन बेंद्रे हे सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या विविध उपक्रमांमध्ये सातत्याने सक्रिय असून त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी यावेळी सांगितले. ''शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आपण पक्षात सक्रियपणे कार्यरत राहणार आहोत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करत पक्षवाढीसाठी पूर्ण ताकदीने काम करणार आहोत.'', असे चेतन बेंद्रे यांनी सांगितले.
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, Deputy Chief Minister Eknath Shinde, एकनाथ शिंदे, Eknath Shinde, खासदार श्रीरंग बारणे, MP Shrirang Barne
- शहर प्रवक्ता, City Spokesperson, शिवसेना पिंपरी-चिंचवड, Shiv Sena Pimpri Chinchwad
- शिवसेना, Shiv Sena, शिवसेना शिंदे गट, Shiv Sena Eknath Shinde, चेतन बेंद्रे, Chetan Bendre, पिंपरी-चिंचवड