फुटपाथ आणि झाडाला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू!

फुटपाथ आणि झाडाला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू!

चिखली | 22 सप्टेंबर 2026 : भरधाव दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथला आणि त्यानंतर झाडाला धडकल्याने 38 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना चिखली परिसरात घडली. अपघाती मृत्यूच्या तपासानंतर चिखली पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रफुल्ल दिवाकर चांदुरकर (वय 38, रा. रुपीनगर, रुपी हाऊसिंग सोसायटी, तळवडे, पुणे) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

28 जुलैच्या रात्री साडेदहा ते 29 जुलैच्या सकाळी सात या कालावधीत चांदुरकर हे होंडा शाईन (एमएच 14 जीव्ही 6437) वरून स्पाईन चौकाकडून चिखलीकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडने घरी जात होते.

जॅग्वार कंपनीसमोर दुचाकी हयगयीने आणि भरधाव वेगात चालवत असताना ती रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथला धडकली आणि त्यानंतर झाडावर आदळली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories