दापोडीत 26 वर्षीय तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार

दापोडीत 26 वर्षीय तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार

दापोडी | 22 सप्टेंबर 2026 : महात्मा फुलेनगर परिसरात रस्त्यावर मित्रांसोबत गप्पा मारत असलेल्या 26 वर्षीय तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारून त्याला जखमी केल्याची घटना घडली. याच घटनेत अन्य तिघांनाही मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश सुखदेव कांबळे (वय 26, रा. महात्मा फुलेनगर, दापोडी) यांनी फिर्याद दिली आहे. योगेश नागेश सूर्यवंशी (वय 35, रा. महात्मा फुलेनगर, दापोडी) असे आरोपीचे नाव आहे.

21 सप्टेंबर रोजी रात्री सव्वाअकराच्या सुमारास महात्मा फुलेनगर कमान रोडवर फिर्यादी त्यांचे मित्र ऋतिक दीपक बाराथे आणि आकाश संजय कांबळे यांच्यासोबत गप्पा मारत होते. त्यावेळी आरोपीने हर्ष विलास कांबळे, आकाश संजय कांबळे आणि सखुबाई संजय कांबळे यांनाही मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

त्यानंतर कोणतेही कारण नसताना फिर्यादीच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारून त्यांना जखमी केले आणि शिवीगाळ करत धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories