डिजिटल अरेस्टची भीती; 68 वर्षीय महिलेची 76 लाखांची फसवणूक!

डिजिटल अरेस्टची भीती; 68 वर्षीय महिलेची 76 लाखांची फसवणूक!

चिखली | 22 सप्टेंबर 2026 : पोलीस अधिकाऱ्याचा गणवेश घालून व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल करणे, आधारकार्डवरून काढलेल्या सिमकार्डचा गैरप्रकार, मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याची भीती दाखवणे आणि सर्वोच्च न्यायालयाचे बनावट अटक वॉरंट दाखवून एका 68 वर्षीय महिलेला तब्बल 76 लाख 22 हजार 541 रुपयांना गंडा घालण्यात आला. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी एका 68 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. 2 ते 9 सप्टेंबरदरम्यान आरोपींनी व्हॉट्सॲपवर संपर्क साधून स्वतः पोलीस अधिकारी असल्याचे भासवले. महिलेच्या आधारकार्डवरून सिमकार्ड काढण्यात आले असून त्यावर गैरप्रकार, मनी लॉन्ड्रिंग आणि गंभीर गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाचे बनावट अटक वॉरंट, नोटिसा आणि सरकारी कागदपत्रेही दाखविण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

महिलेला डिजिटल स्वरूपात घरातच अटक असल्याची भीती दाखवून तिच्याकडील सर्व रक्कम शासनाकडे पडताळणीसाठी जमा करावी लागेल आणि नंतर ती परत मिळेल, असे सांगण्यात आले. त्यानंतर वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण 76,22,541 रुपये भरण्यास भाग पाडल्याचे पोलिसांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे. आरोपींना अद्याप अटक झालेली नाही.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories