चिखली परिसरात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा जप्त
पिंपरी, ता. ६ - शासनाने प्रतिबंधीत केलेला ३६ हजार ५८८ रुपयांचा गुटखा अंमली पदार्थ विरोधी पथकाने गुरुवारी (ता. ४) कुदळवाडी-चिखली परिसरातून जप्त केला आहे. हा गुटखा सुगंधित तंबाखू, पानमसाला बाळगणाऱ्या २६ वर्षीय आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ४ जूनला कुदळवाडी-चिखली येथील विसावा चौक शेजारील ठिकाणी छापा टाकला.
या ठिकाणी आरोपी दिलीप ऊर्फ ओमप्रकाश राजाराम मोदनवाल (वय २६, रा. शिवसाई वजनकाट्याजवळ, विसावा चौक, कुदळवाडी, चिखली,याला प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री करताना पकडण्यात आले.
आरोपीने महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तांच्या आदेशांचे उल्लंघन करून शासनाने प्रतिबंधित केलेले गुटखा, सुगंधित तंबाखू व पानमसाला यांचा साठा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विक्रीसाठी ठेवला होता. या पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्यास गंभीर धोका निर्माण होतो, तसेच मुखाच्या कर्करोगासारखे आजार उद्भवू शकतात, हे माहिती असूनही आरोपीने हा अवैध व्यवसाय सुरु ठेवला होता.
कारवाईदरम्यान पोलिसांनी एकूण रुपये ३६,५८८/- किंमतीचा विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू, पानमसाला तसेच एक मोबाईल जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 123, 271, 272, 274, 275, 223 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 30(2)(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस शिपाई संतोष विभीषण सपकाळ यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली.