आळंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत २२ हजार रुपयांची विदेशी दारु जप्त
पिंपरी, ता. ६ - आळंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मरकळ रस्ता परिसरात पोलिसांनी 22 हजार रुपयांची विदेशी दारु शुक्रवारी (ता. ५) जप्त केली. ही दारु स्वीफ्ट कारमधून विक्रीसाठी मिळणाऱ्या 28 वर्षीय आरोपीला पोलिसांनी नोटीस बजावली आहे
मरकळ रोडवरील चहोली (खु) परिसरातील कल्वर हॉटेलसमोर आरोपी ऋषीकेश अण्णासाहेब चव्हाण (वय २८, रा. शिवलेवस्ती, भावडी रोड, तुळापूर, ता. हवेली, जि. पुणे) याला विदेशी दारुची अवैध वाहतूक करताना पकडण्यात आले. आरोपी पाच लाखांच्या स्वीफ्ट कारमधून 22,005/- रुपयांची विदेशी दारु विक्रीसाठी नेत होता. कार आणि दारु असा एकूण 5,22,005/- रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या प्रकरणी आरोपीवर आळंदी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस BNSS कलम 35(3) अन्वये नोटीस देण्यात आली आहे.
ही कारवाई गुन्हे शाखा युनिट-३, पिंपरी चिंचवड येथील पोलिस शिपाई समीर कुंडलिक काळे यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली.