भर रस्त्यात दारुच्या नशेत पत्नीला मारहाण, चिखलीतील घटना

भर रस्त्यात दारुच्या नशेत पत्नीला मारहाण, चिखलीतील घटना

 भर रस्त्यात दारुच्या नशेत पत्नीला मारहाण, चिखलीतील घटना 

पिंपरी, ता. ६ - दारुच्या नशेत पत्नीला मारहाण करुन जखमी करणाऱ्या पतीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मारहाणीची ही घटना शुक्रवारी (ता. ५) चिखली येथील रोकडे वस्तीमधील महादेव मंदीराकडे जाणा-या रस्त्यावर घडली.

याबाबत पत्नीने पोलिसांत तक्रार दिली. आरोपी पती राजू नामदेव भुसारे (वय ४० वर्षे) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राजू भुसारे याची पत्नी त्यांच्या मुलांसह कामावरुन जेवणासाठी घरी जात होती. तेव्हा त्याने दारुच्या नशेत रस्त्यात पत्नीला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तसेच रस्त्यावर पडलेला दगड पत्नीच्या डोक्यावर मारल्याने पत्नी जखमी झाली आहे. 

आरोपी पतीवर चिखली पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम-११८ (२),११५ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. 





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories