जुन्या भांडणाच्या रागातून युवकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला

जुन्या भांडणाच्या रागातून युवकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला

जुन्या भांडणाच्या रागातून युवकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला 

पिंपरी, ता. २२ - जुन्या भांडणाच्या रागातून २४ वर्षीय युवकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना रविवारी (ता. २१) साने चौक-चिखली परिसरात घडली आहे. मारहाण करणाऱ्या युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

याबाबत, मारहाण झालेला युवक विनायक ऊर्फ बाबू राजू ननावरे (वय-२४ वर्षे, रा. सुदर्शन नगर, साने चौक, चिखली) याने पोलिसांत तक्रार दिली आहे. आरोपी, १) सिध्दार्थ धाईजे (वय २१ वर्षे, रा. पत्राशेड, अंजठानगर निगडी) व २) शिवशंकर श्रीमंगल (वय २० वर्षे) व त्याचे दोन अनोळखी मित्र (रा. चाकण) यांना पोलिसांनी अटक केली आहे. 

रविवारी (ता. २१) जय अंबे इलेक्ट्रीकल्स, साने चौक, चिखली या ठिकाणी आरोपी व त्यांच्या अनोळखी दोन मित्रांनी फिर्यादी विनायकला जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने त्याच्या डोक्यावर व हातावर वार केले. यामध्ये विनायक गंभीर जखमी झाला आहे. जुन्या भांडणाच्या रागातून आरोपींनी हल्ला केला आहे. विनायकचा मित्र फिर्यादीचा मित्र ऋतीक कसाळकर याला कानाखाली मारली आणि या आरोपींनी तेथून निघून जाताना कोयते हवेत उगारुन लोकांना "समोर याल तर ऐकेकाला बघून घेईन" अशी धमकी देऊन दहशत निर्माण केली.

आरोपींवर चिखली पोलिस ठाण्यात भारतीय  न्याय संहिता कलम १०९, ११५ (२), ३ (५) सह शस्त्र अधिनियम कायदा कलम-४,२५,२७ सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंड अॅक्ट कलम ३,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories