news
clock
अंगारकी चतुर्थीनिमित्त चिंचवडचा राजा गणपती मंदिरात ‘मोगरा महोत्सव व चंदन उटी’ सोहळा

अंगारकी चतुर्थीनिमित्त चिंचवडचा राजा गणपती मंदिरात ‘मोगरा महोत्सव व चंदन उटी’ सोहळा

अंगारकी चतुर्थीनिमित्त चिंचवडचा राजा गणपती मंदिरात ‘मोगरा महोत्सव व चंदन उटी’ सोहळा 

पिंपरी, ता. ७ - अंगारकी चतुर्थीनिमित्त मंगळवारी (ता. ५) श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळाने ‘चिंचवडचा राजा’गणपती मंदिरात मोगरा महोत्सव व चंदन उटी सोहळ्याने संपूर्ण वातावरण मंगलमय व प्रसन्न झाले. बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी आणि हा सोहळा अनुभवण्यासाठी चिंचवडकर नागरिकांची मंदिरात प्रचंड गर्दी झाली होती. 

बाप्पांची महाआरती सामाजिक कार्यकर्ते उद्योजक उमेश चांदगुडे यांच्या हस्ते  झाली. अंगारकी चतुर्थीनिमित्त मंदिरात दिवसभर विविध उपक्रम राबविण्यात आले. यात  श्री बाळासाहेब पंढरपुरे गुरुजी व ब्रह्मवृंद यांच्या मंत्रोच्चारात श्री गणेश सहस्रावर्तन व इत्यादी धार्मिक विधी पार पाडले. रात्री सुमारे ४००० पेक्षा जास्त मोरयाभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

यावेळी श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळाचे अध्यक्ष ॲड. मोरेश्वर शेडगे, माजी उपमहापौर तुषार हिंगे, नगरसेवक राहुल कलाटे, ॲड. रोहन जमादार माळवदकर, नगरसेवक मंदार देशपांडे, राजाभाऊ गोलांडे, कुणाल लांडगे, मंडळाचे आधारस्तंभ विठ्ठल सायकर, ॲड.सुनिल होनराव, संजय संगमनेरकर, हेमंत डांगे, महेश लांडगे, सोमेश चव्हाण, राजेश शिरोळे, सुहास पोफळे कार्याध्यक्ष महेश मिरजकर, ॲड.विपुल नेवाळे यांसह मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते योगेश मिरजकर, अविनाश तिकोने, आदित्य मिरजकर, आनंद सायकर, हर्षल मिरजकर, प्रथमेश रत्नपारखी, संजय कारेकर, दुर्गेश मिरजकर, श्रेयस सायकर, अक्षय जाधव, विशाल गावडे, रोहन जाधव, आकाश जमदाडे, सतीश देशमुख, विशाल भदे, सुयोग चाळके, प्रमोद चाळके, शुभम पोरे, प्रतीक मिरजकर, चैतन्य आहेर, मुकेश चौधरी, धनंजय शालिग्राम यांच्यासह मोरया भक्त व चिंचवडकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories