news
clock
चोविसावाडी- दत्तवाडी- काळीभिंत परिसरातील समस्यांची महापौर स्वतः पाहणी करणार

चोविसावाडी- दत्तवाडी- काळीभिंत परिसरातील समस्यांची महापौर स्वतः पाहणी करणार

चोविसावाडी- दत्तवाडी- काळीभिंत परिसरातील समस्यांची महापौर स्वतः पाहणी करणार 

पिंपरी,  ता. ३० - चोविसावाडी हद्दीतील दत्तवाडी काळीभिंत परिसरातील नागरी समस्यांबाबत स्थानिक नागरीकांनी सामाजिक कार्यकर्ते, भाजपचे नेते बाळासाहेब मोळक यांच्या पुढाकाराने गुरुवारी (ता. ३०) महापालिकेत महापौर रवी लांडगे यांची भेट घेतली. 

यावेळी महापौरांसोबत नागरीकांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीस सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत डीपी रोड, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, स्वच्छता, स्ट्रीटलाईट्स आदी मूलभूत नागरी सुविधांबाबत सविस्तर चर्चा करून तातडीने कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

महापौर रवी लांडगे व सर्व विभागाचे अधिकारी बुधवारी, ६ मे रोजी सकाळी ११ वाजता  दत्तवाडी काळीभिंत परिसरात प्रत्यक्ष पाहणीसाठी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरीकांना आपले प्रश्न लवकर सुटतील अशी अपेक्षा आहे, अशी माहिती बाळासाहेब मोळक यांनी दिली. 




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories