'साहित्यरत्न दौड'ला शहरवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी, ता. ३ ऑगस्ट २०२६ - साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या व आमदार अमित गोरखे यूथ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. २) आयोजित करण्यात आलेल्या 'साहित्यरत्न दौड'मध्ये शहरवासिय उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
चिंचवड येथील बर्ड व्हॅली उद्यान चौकातून मॅरथॉनला उत्साहात प्रारंभ झाला. शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध वयोगटातील नागरिक साहित्यदौडमध्ये सहभागी झाले. या मॅरेथॉमधून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर झाला.
यावेळी आमदार शंकर जगताप,अमित गोरखे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उपमहापौर शर्मिला बाबर, माजी महापौर योगेश बहल, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे सभापती कैलास कुटे, ब प्रभाग अध्यक्ष मंदार देशपांडे, नगरसदस्य शत्रुघ्न बापू काटे, शितल शिंदे, तुषार हिंगे, कुशाग्र कदम, धर्मपाल तंतरपाळे, अनिल घोलप, अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी नगरसदस्य राजू दुर्गे, सुजाता पलांडे, उमेश चांदगुडे, उप आयुक्त अण्णा बोदडे, पंकज पाटील, शिवसेना उपनेते इरफान सय्यद, नेताजी शिंदे, गणेश लंगोटे, वैशाली खाडे, धरम वाघमारे, मंगेश घाडगे, अनिता वाळुंजकर आदी मान्यवर उपस्थित होते.
साहित्य दौड......एकात्मतेचा संदेश देणारा उपक्रम
"साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांनी समता, सामाजिक न्याय आणि परिवर्तनाचा विचार समाजासमोर मांडला. त्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी 'साहित्यरत्न दौड' हे प्रभावी माध्यम ठरत आहे. ही केवळ धावण्याची स्पर्धा नसून सामाजिक बांधिलकी, एकात्मता आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा लोकसहभागाचा उपक्रम आहे. युवकांनी निरोगी जीवनशैली स्वीकारत समाज परिवर्तनाच्या विचारांशी जोडले जावे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे." - आमदार अमित गोरखे
